Maharashtra local body elections extend to 2026 : महाराष्ट्रातील महानगरपालिका तसेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

maharshtra local body election महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे आता वाट पाहावी लागणार आहे

मंगळवारी या संदर्भात न्यायालय मध्ये सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा मुदत वाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण तसेच ईव्हीएम मशीनची आपूर्तता, सणांच्या सुट्ट्या कर्मचारी वर्गाच्या कमतरतेमुळे मुदतवाढ मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

पाठीमागील मे महिन्यामध्ये झालेल्या सुनावणी मध्ये न्यायालयाने ऑक्टोबर पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने वॉर्ड पुनर्रचना, मतदार यादी, या गोष्टींवर काम सुरू केले आहे. परंतु राज्य सरकार ईव्हीएम मशीन सणांच्या सुट्ट्या तसेच कर्मचारी वर्गाची कमतरता भासत आहे असे निवडणूक आयोगाला सांगितले.

गेल्या पाच वर्षापासून निवडणुकांवरील असलेली स्थगिती न्यायालयाने उठवली होती त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत निवडणुका उरकून घेण्याच्या आदेश दिले होते. ओबीसी आरक्षण आणि अन्य कारणांमळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

काय झालं सुनावणी मध्ये

न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुकांमध्ये उशीर का होत आहे असे विचारले असता राज्य सरकारने आपली बाजू मांडली.

कधी होणार महाराष्ट्रात निवडणूक

न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका तसेच पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन 31 जानेवारी पर्यंत निकाल घोषित करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *