लडकी बहीण योजना मोठी अपडेट
आता अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अंगणवाडी सेविकांमार्फत सरकारने त्या संदर्भात एक सर्वे केला. सर्वेक्षण करताना जो क्रायटेरिया वापरला गेला त्या सर्वेक्षणानुसार बऱ्याच महिला बऱ्याच महिला यामध्ये अपात्र झाल्या आहेत. यामध्ये 1 लाख 25 हजार महिला अपात्र झालेल्या दिसून आले आहे हे आकडे सर्वेक्षणानुसार मराठवाड्यामध्ये समोर आले आहेत. अपात्र असून सुद्धा या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला तरी आता त्यांना या योजनेपासून लाभ घेता येणार नाही यासंदर्भात पाऊले उचलली जातील
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस संदर्भात सर्वेक्षणातून आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
65 वर्षे वयाच्या वरील महिला
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत एक लाख तीस हजार महिलांचा सर्वे करण्यात आला. 65 वर्षे वयाच्या वरील एक लाख 35000 महिलांचा सर्वे करण्यात आला त्यातील सुमारे 40 हजार महिलां अपात्र ठरवण्यात आले 65 वयापेक्षा जास्त वय असून सुद्धा या महिलांनी चुकीची कागदपत्रे सादर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच 21 वर्षाखालील महिलांनी याचा लाभ घेत नाही त्यांनाही अपात्र ठरवण्यात येणार आहे.
एकाच परिवारातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी.
एकच घरामधील लाभार्थी जास्त असलेली चार लाख नऊ हजार एवढी कागदपत्रे तपासली गेली त्यामध्ये 84 हजार महिला या अपात्र आहेत असे सर्वेतून समोर आले या महिलांना सरकार अपात्र ठरवणार असून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करणार येणार आहे.
आयटी रिटर्न्स भरणाऱ्या महिला..
ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तसेच
ज्या महिला आयटी रिटर्न्स भरत आहेत अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.सर्वेक्षणातून ही बाब समोर आली ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे असे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनाही अपात्र ठरवण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणासाठी आठ ते नऊ लाख अंगणवाडी सेविका कार्यकर्त्यांची नेमणूक शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली आहे. तसेच या सर्वेक्षणाचा अहवाल लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारकडे सोपवण्यात येणार असून या सगळ्याचा विचार करून सरकार प्रशासन कारवाई करेल.
सरकारच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त तान राज्यावरचा वाढता कर्जाचा बोजा या सर्व कारणांमुळे राज्य सरकार लवकरात लवकर या गोष्टीवर उपाययोजना करते की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल. तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहात की नाही?

