Kunbi certificate हैदराबाद गॅजेट Gr विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली असून कोर्टाने याचिका कर्त्यांना या जीआरमुळे ओबीसीचे कोणते नुकसान होत आहे या चे स्पष्टीकरण मागितले कोर्टाने याबाबत शंका उपस्थित करत ही रद्द केली. परंतु याचिका कर्त्यांना पुन्हा खालच्या कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे.
कोणतीही जनहीत याचीका दाखल करताना त्यासोबत mentyabliti असणे फार गरजेचे आहे असे कोर्टाने म्हटले आहे.
याचिका दाखल करताना ज्या कारणाविरोधात याचिका दाखल केली जात आहे त्या कारणामुळे होणाऱ्या परिणामांचा पुरावा हा सादर करणे गरजेचे आहे तरच ती याचिका ग्राह्य धरली जाते आणि त्याच्यावर विचार केला जातो याच कारणामुळे कोर्टाने याचिका करते विनीत धोत्रे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना ही याचिका रद्द केली.
सोमवारी कोर्टासमोर अजून एका याचीकीवर सुनावणी होणार आहे.
मराठा समाजासाठी आणि सरकारसाठी हा तातपुरता दिलासा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी बोलताना सांगितले होते की हा जीआर कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून ज्या लोकांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी काढलेला जीआर आहे. सरकारने यामध्ये संपूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून हा जीआर काढलेला आहे त्यामुळे जरी जीआर विरोधात याचीका दाखल केली तरी सरकार त्या जीआर चे संरक्षण करण्यासाठी कोर्टामध्ये आपली बाजू मांडेल.

