अजित दादांच्या हस्ते बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्रांची वाटप
मनोज जरांगे पाटलांना दिलेली डेडलाईन देवेंद्र फडणवीस सरकारने पाळलेली असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
बीड रेल्वे लोकार्पण सोहळ्या करता अजित दादा बीड दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या जीआर ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामध्ये या मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र साठी अर्ज केला होता त्या पात्र व्यक्तींना या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले
हैदराबाद गॅजेटमुळे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचे हे यश म्हणावे लागेल
आज बीड रेल्वे लोकर पण सोहळ्याकरता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झंडा दाखवल्यानंतर बीड रेल्वे स्थानकाची लोकार्पण करण्यात आली या लवकर पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फड़नविस, अजित दादा, पंकजा, मुंडे बजरंग बप्पा सोनवणे, तसेच बीड जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित होतेया लवकर पण सोहळ्या बीड जिल्ह्याला एवढ्या वर्ष जी काही वाट पाहिली लागली ती आता पूर्णत्वास आली यासोबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही श्रेयवाद न घेता बीडच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे म्हटले
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला जीआर हा असंविधानिक असून हा GR तत्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे. तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली आहे.

